अमळनेर प्रतिनिधी । ‘लघुशंका का करत आहे’, या कारणावरून चौघांनी एकाला जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना भारत सायकल मार्ट जवळ घडली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस स्थानकात चौघांविरोधात ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कुणाल देविदास घोगले हा दि.१६ नोव्हेंबर रोजी भारत सायकल मार्ट जवळील शौचालयाजवळ लघु शंकेला गेला असताना केसर (पूर्ण नाव माहीत नाही), इरफान भंगार वाल्याचा मुलगा, आबीदचा भाऊ, व तौफिक जडी बुटीवाला यांनी त्याला हटकले आणि जातीवाचक शिवीगाळ केली. त्याचवेळी इरफानने त्याच्या पाठीवर सायकल मारून दुखापत केली कुणाल याच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला चौघाविरुद्ध ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास डी.वाय.एस.पी. राकेश जाधव करीत आहेत.