Home मनोरंजन पुन्हा सुरू होणार डान्स बारची छम छम !

पुन्हा सुरू होणार डान्स बारची छम छम !

0
60

मुंबई प्रतिनिधी । डान्सबारबाबत महाराष्ट्र सरकारच्या जाचक अटी सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यामुळे आता राज्यात डान्स बारची छमछम सुरू होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

महाराष्ट्र सरकारने डान्स बारवर बंदी घातली आहे. यामुळे हॉटेल मालक न्यायालयात गेले होते. येथे अनेक वर्षांपासून कायदेशीर लढाई सुरू आहे. यात आज सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला धक्का देत सरकारच्या सर्व अटी रद्द केल्या आहेत. महाराष्ट्र सरकारच्या अटी जाचक असल्याचा हॉटेल मालकांचा दावा न्यायालयाने मान्य केला आहे. यामुळे आता राज्यात पुन्हा एकदा डान्स बार सुरू होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

याआधी न्यायालयानं डान्स प्रकरणातील निकाल राखून ठेवला होता. राज्य सरकारनं डान्स बार संदर्भात केलेल्या कायद्याची माहिती सुनावणी दरम्यान न्यायालयाला दिली होती. या कायद्यामुळे अनेक बेकायदा गोष्टी आणि महिलांचं शोषण रोखता येत असल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला. मात्र सरकारनं घालून दिलेले अनेक नियम न्यायालयानं रद्द केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound