श्री संत संताजी पुण्यतिथी निमित्ताने उत्सव समिती अध्यक्षपदी उमेश चौधरी*संताजी पुण्यतिथी निमित्ताने उत्सव समिती अध्यक्षपदी उमेश चौधरी

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पारोळा शहरातील नव तेली भवन येथे सालाबाद प्रमाणे मीटिंग घेण्यात आली मीटिंग सुरू होण्याअगोदर वर्षभरामध्ये समाजातील मरण पावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आले आणि मिटींगला सुरुवात करण्यात आली. मीटिंगमध्ये मनोज चौधरी सचिव यांनी आवक जावक खर्चाचे सर्व हिशोब मांडून दिला आणि आवक जावक विषयावर चर्चा करण्यात आली.

तेली समाज पंच मंडळाकडून सालाबाद प्रमाणे येणाऱ्या 28 डिसेंबरला श्री संत संताजी जगन्नाडे महाराज पुण्यतिथी आहे पुण्यतिथी साजरी करावी यावर विषयावर चर्चा करण्यात आले. व श्री संत संताजी पुण्यतिथी उत्सव समिती अध्यक्षपदी उमेश चौधरी] उपाध्यक्षपदी महेश चौधरी, उपाध्यक्षपदी सुरज चौधरी, खजिनदारपदी गोरख चौधरी यांची निवड करण्यात आली.

यावेळी तेली समाज अध्यक्ष कैलास चौधरी, उपाध्यक्ष संजय चौधरी, सचिव मनोज चौधरी, दिलीप चौधरी, सतीष चौधरी, पत्रकार विश्वास चौधरी, किशोर चौधरी, अनिल चौधरी, सुरेश चौधरी, भास्कर चौधरी, गोकुळ चौधरी, कपिल चौधरी, किरण चौधरी, भैय्या चौधरी, साहेबराव चौधरी, रवींद्र चौधरी, अनिल चौधरी व समाजसेवक साहेबराव ठाकरे (न्हावी) सामाजिक कार्यकर्ते भागवत चौधरी, शिवसेनेचे शहरप्रमुख अमृत चौधरी व नवयुवक तेली समाज मंडळाचे अध्यक्ष कुशाल चौधरी व नवयुवक मंडळाचे सर्व सभासद पदाधिकारी तेली समाजाचे माजी अध्यक्ष प्रल्हाद चौधरी, तेली समाज बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष प्रवीण चौधरी तेली समाजाचे माजी नगरसेवक पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते.

Protected Content