वाढदिवशी डॉ.केतकीताई पाटील यांनी दिला पर्यावरण संवर्धन व वृक्षारोपणाचा संदेश

जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  गोदावरी फाऊंडेशनच्या सदस्या डॉ.केतकीताई पाटील यांनी आपल्या वाढदिवसानिमित्‍त जिल्ह्यातील तालुक्यांच्या ठिकाणी वृक्षारोपण करुन पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. व्यावसायाने डॉक्टर असल्याने रुग्णसेेवा व सामाजिक सेवेबरोबर वृक्षारोपण उपक्रमातून डॉ.केतकी पाटील यांची पर्यावरणाबद्दलची ओढही जिल्हावासियांनी आज अनुभवली.

 

गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील व सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ.वर्षा पाटील यांची कन्या डॉ.केतकी वैभव पाटील ह्या आपल्या जन्मदात्यांच्या पावलावर पाऊल ठेवतं आरोग्य क्षेत्र, सामाजिक क्षेत्रातील कार्यावर भर देत आहे. नुकताच ९ ऑगस्ट रोजी डॉ.केतकी पाटील यांचा वाढदिवस त्यांच्या इच्छेने संपूर्ण जिल्हाभरात वृक्षारोपण कार्यक्रमाने साजरा करण्यात आला. आज सकाळी सर्वप्रथम शहरातील ओंकारेश्वर मंदिरात देवाचा आशिर्वाद घेऊन दिवसाची सुरवात झाली, यानंतर संपूर्ण गोदावरी फाऊंडेशनमधील सदस्यांनी सकाळी ६ वाजेपासून शुभेच्छा देण्याकरीता भास्कर मार्केटमधील निवासस्थानी भेट दिली. तद्नंतर जामनेर तालुक्यापासून वृक्षारोपण उपक्रमाचा श्रीगणेशा झाला. यात नेरी दिगर, जामनेर, विटाळी ता नांदुरा, मलकापूर आदि ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते, नगरपरिषद, ग्रामपंचायत, विविध फाऊंडेशन यांच्यासमवेत वृक्षारोपणाचा उपक्रम उत्साहात पार पडला.

 

यात जामनेर नगरपालिका, सेवालाल कॉम्प्युटर्स, नांदूरा तालुका विटाळी ग्रामपंचायत, जागर फाऊंडेशन मलकापूर, रावेर येथे समस्त माळी समाज पंचमंडळ व शिवराणा क्रिडा व सांस्कृतिक मंडळ, बोदवड येथील विश्रामगृह, यावल व रावेर येथे प्रतिष्ठीत नागरिकांतर्फे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. रात्री उशिरापर्यंत जळगाव येथील निवासस्थानी हितचिंतकांद्वारे डॉ.केतकी पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.

 

 

जामनेर तालुक्यातील नेरी दिगर येथील सुयश हॉस्पिटलचे डॉ.सतीश पाटील यांनी आपल्या हॉस्पिटलमध्ये डॉ.केतकी पाटील यांना आमंत्रित करुन केक कापला. त्यानंतर नेरी दिगर येथील ग्रामपंचायत कार्यालयात हेमंत फाऊंडेशनच्या सहकार्याने डॉ.केतकी पाटील यांच्यासह बालकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र बंडू कोलते, उपसरपंच प्रकाश बोरसे, ग्रामपंचायत सदस्य अर्चना भूषण भंगाळे, सुलोचना कोलते, नयना नाना बोरसे, ग्रामसेवक जाधव, नेरी चे सरपंच सुभाष मोरे आणि हेमंत फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष हेमंत भंगाळे यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जामनेर शहरात ठिकठिकाणी डॉ.केतकीताई पाटील यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी प्रथमतः जामनेर शहरातील सेवालाल कॅम्पुटर अ‍ॅण्ड झेरॉक्सचे संचालक मुलचंद नाईक यांनी ताईंचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केले. यावेळी डॉ.रूपाली नाईक, सोनू सिंग राठोड, शरद पाटील, विजय जगन तवर, योगेश नाईक, राहुल नाईक आणि नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

——

 

जामनेर नपातर्फे वृक्षारोपण

डॉ.केतकी पाटील यांच्या ३५  व्या वाढदिवसानिमित्‍त जामनेर नगरपरिषद यांच्या सौजन्याने ३५ वृक्षांचे रोपण करण्यात आले. याशिवाय क्रांतीसुर्य महाराणा प्रताप चौकात केक कापून जल्लोष साजरा करण्यात आला. याप्रसंगी काँग्रेस तालुका अध्यक्ष शंकर राजपूत, जगदेव बोरसे, गणेश झाल्टे, वसीम शेख, डॉ.असिफ खान, अशोक हरी रोकडे, मुसा भाई, रफिक मौलाना, सोनू सिंह ठाकुर, विकास पाटील, गोरख नरवाडे आदिंची उपस्थिती होती.

 

 

नांदुरा तालुक्यात वृक्ष लागवड

नांदुरा तालुक्यातील विटाळी या गावात ग्रामपंचायत कार्यालयाच्या सहकार्याने ३५ वृक्षांची लागवड करण्यात आले.यावेळी सरपंच गजाननराव शिरसागर, उपसरपंच गजाननराव चौधरी,गोपाल बोरसे, किशन सावळे, समाधान बोदवडे, गजानन कान्हेरकर, शांताराम क्षीरसागर,राजेंद्र राऊत, गोपाल बोंडे, विजय इंगळे,किशोर बोरसे, गोपाल सावळे, गोपाल क्षीरसागर, संकेत क्षीरसागर, आनंद बोदवडे, अनंता क्षीरसागर, चंद्रशेखर काटे, रामकृष्ण राऊत, प्रदीप क्षीरसागर ,मनोहर राऊत, वासुदेव काटे, वासुदेव सुरळकर, नामदेवराव बोधवडे, आत्माराम पाटील, प्रभाकर बोधवडे, युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष विष्णू क्षीरसागर आदी गावकर्‍यांची उपस्थिती होती.

 

 

जागर फाऊंडेशन मलकापूरतर्फे उपक्रम

गोदावरी फाउंडेशनच्या सदस्या डॉ.केतकीताई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जागर फाउंडेशन मलकापूर यांच्या सौजन्याने ने वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी डॉ.नितीन बर्‍हाटे, विजय राणे, अनिल वराडे, राजू सुपे, शाम वानखडे, संदीप झोपे, डॉ.गजानन गोळे, चेतन होले यांच्यासह प्रमुख अतिथी विनोद खर्चे, अनिल पाटील, रवींद्र खडसे, बरसू टेकाडे, शशांक चोपडे, ज्ञानेश्वर माटे, मयूर खर्चे आदींची उपस्थिती होती.

 

 

समस्त माळी समाज पंचमंडळ व शिवराणा क्रिडा व सांस्कृतिक मंडळ, रावेर

रावेर येथे समस्त माळी समाज पंचमंडळ व गावातील प्रतिष्ठित व्यक्ती यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले चौक, रावेर येथील माळी समाज मंगल कार्यालय परिसरात येथे डॉ.केतकीताई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. हे वृक्षारोपण शिवराणा क्रिडा व सांस्कृतिक मंडळाच्या सौजन्याने पार पडले. यावेळी समस्त माळी पंच मंडळाचे विश्वस्त प्रल्हाद रामदास महाजन, अध्यक्ष रमेश नामदेव महाजन, उपाध्यक्ष राजेंद्र रामदास महाजन, सचिव विनोद पाटील, रवींद्र तुळशीराम पाटील, अरुण महाजन, सुकलाल ओंकार महाजन, पंडित महाजन, मनोज महाजन, तुषार एकनाथ मानकर, मनोज तुळशीराम महाजन, प्रकाश प्रभाकर महाजन, अरूण नामदेव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

Protected Content