चाळीगसाव प्रतिनिधी । शहरातील सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने आज कारगील दिन किल्ले राजदेहरे येथे मोजक्या मावळ्यांच्या उपस्थितीत सोशल डिस्टन पाळून साजरा करण्यात आला.
कारगील विजय हा संपुर्ण देशासाठी अभिमानाचा दिवस असून सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्राच्या वतीने दरवर्षी हा विजय दिन भारतीय लष्करातील जवानांचा सन्मान करून पुणे पिंपरी चिंचवड येथे सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रमिक गोजमगुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणावर साजरा करत असते. यंदा संपूर्ण महाराष्ट्रातून वेगवेगळ्या गावात हा शौर्य तुला वंदितो. कारगील विजय दिवस साजरा करण्याचा सह्याद्री प्रतिष्ठानचा मोठा मानस होता, मात्र करोना महामारी संकटामुळे हा ‘विजय दिन’ मोठ्या प्रमाणात साजरा करता आला नसल्याने २६ जुलै रोजी सह्याद्री प्रतिष्ठान चाळीसगावच्या वतीने कारगिल दिन किल्ले राजदेहरे ता.चाळीसगाव येथे मोजक्या लोकांच्या उपस्थितीत सोशल डिस्टन पाळून साजरा करण्यात आला.
कारगिल वीजयातील शहीद जवान युद्धात सहभागी झालेले जवान तसेच युद्धात जखमी झालेल्या जवानांना अभिवादन करून किल्ल्यावर भगवा ध्वज फडकावून मानवंदना देण्यात आली. यावेळी सह्याद्री प्रतिष्ठानचे दिलीप घोरपडे, गजानन मोरे, विनोद शिंपी, दीपक राजपूत, सचिन पाटील, योगेश शेळके, जितेंद्र वाघ, दिगंबर शिर्के, वाल्मीक पाटील, सचिन घोरपडे, सचिन देवरे, साहिल शिंपी, जयेश राजपूत, यश चिंचोले, प्रणव कुडे, समीर शिंपी, रितेश पाटील, प्रियांशू पाटील, कुंदन राजपूत आदी सहभागी झाले.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/293528631982708/