इम्प्लांट फेल्युअर झालेल्या रूग्णावर डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सोयगाव तालुक्यातील निंबायती येथील इम्प्लांट फेल्युअर झालेल्या एका ३० वर्षीय रूग्णावर डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील अस्थिरोग तज्ज्ञांनी केलेली शस्त्रक्रिया अनुभवाच्या बळावर यशस्वी ठरली. त्यामुळे रूग्ण आता पुन्हा त्याच्या पायावर पुन्हा उभा राहू लागला. याबाबत माहिती अशी की, वर्षभरापूर्वी जमील तडवी (वय ३०) याचा अपघात झाला होता. या अपघातात त्याच्या मांडीचे हाड फ्रॅक्‍चर झाले होते. त्याने एका खासगी रूग्णालयात शस्त्रक्रिया करून उपचार घेतले होते.

अवघ्या तीन महिन्यातच त्याच्या पायात टाकलेला रॉड आणि स्क्रु हे सरकून बाहेर आले होते. ज्याला इम्प्लांट फेल्युअर असे म्हणतात. इम्प्लांट फेल्युअर हे अत्यंत गुंतागुंतीचे असते. त्यामुळे सहसा इतर तज्ञ उपचार करण्यास फारशी उत्सुकता दाखवत नाहीत. दरम्यान जमील तडवी ह्या रूग्णाला असाच अनुभव आल्यानंतर तो उपचारासाठी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयात दाखल झाला. याठिकाणी अस्थिरोग विभागातील तज्ज्ञ डॉ. प्रमोद सारकेलवाड यांनी त्याच्या मांडीचा एक्स-रे आणि विविध तपासण्या केल्या. तपासणीअंती इम्प्लांट फेल्युअरचे निदान करण्यात आले. निदानानंतर रूग्णावर शस्त्रक्रिया करणे अत्यंत जोखमीचे आणि गुंतागुंतीचे होते. कारण या शस्त्रक्रियेत हाडातून सरकलेला रॉड व स्क्रु बाहेर काढून ते परत जागेवर आणणे आणि त्यानंतर पुन्हा नवीन रॉड आणि स्क्रुच्या सहाय्याने परत जोडणे अशी गुंतागुंत होती. मात्र डॉ. प्रमोद सारकेलवाड यांनी जोखीम स्विकारून अनुभव अन् कौशल्याच्या बळावर ही शस्त्रक्रिया यशस्वी केली. या शस्त्रक्रियेमुळे रूग्णाला त्याच्या पायावर पुन्हा उभे राहता येऊ लागले आणि खाली बसता देखिल येऊ लागले. या शस्त्रक्रियेसाठी डॉ. पियुष पवार, डॉ शुभम अडकीते, डॉ. सौरभ पाटील, भूलशास्त्र तज्ञ डॉ. मिनल कुटुंबे, डॉ. सतीश, डॉ. शिवाजी यांनी सहकार्य केले.

Protected Content