धावत्या रेल्वेच्या धक्क्याने वृध्द ठार

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धावत्या रेल्वेखाली आल्याने ६० वर्षीय वृध्दाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना जळगाव तालुक्यातील शिरसोली ते दापोरा दरम्यानच्या रेल्वेरूळावर शुक्रवारी ५ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता उघडकीला आले आहे.  आधार बुधा पाटील वय-६० रा. शिरसोली ता.जि.जळगाव असे मयत झालेल्या वृध्दाचे नाव आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील शिरसोली गावात आधार पाटील हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला होते. शेतमजूरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत असतात. शुक्रवारी ५ जानेवारी रोजी आधार पाटील हे शिरसोली ते दापोराकडील रेल्वेरूळाकडे जात होते. दुपारी २ वाजेच्या सुमारास रेल्वेरूळाजवळून जात असतांना धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने  त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी धाव घेवून ही माहिती एमआयडीसी पोलीसांना कळविण्यात आली. पोलीसांनी घटनास्थळी घेवून मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला. त्यानंतर मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात दाखल करण्यात आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Protected Content