जळगाव प्रतिनिधी । शहरातल्या रथचौकातील राम मंदिरालगतचे जीर्ण घर अचानक कोसळले असून यात कुणी राहत नसल्याने हानी टळली.
याबाबत वृत्त असे की, शहरातील रथ चौकामध्ये गोकुळ नारायण भावसार यांच्या मालकीचे अतिशय जीर्ण घर आहे. या घरात अनेक वर्षांपासून कुणी राहत नाही. शनिवाारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास हे घर कोसळले. सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नाही.