लग्नातील जुना वाद : रस्त्यावर जाताच केली मारहाण !

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | पिंप्राळा हुडको परिसरात लग्नात झालेल्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणाला ३ जणांनी शिवीगाळ करत दगडाने मारहाण करून दुखापत केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, अवेज शेख अब्बास वय-२१, रा. मेहरूण, जळगाव हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. गुरुवार 30 मे रोजी दुपारी साडेतीन वाजता अवेज पिंप्राळा हुडको परिसरात कामाच्या निमित्ताने आलेला होता त्यावेळी लग्नाचे लग्नात झालेल्या भांडणाच्या कारणावरून रईस शेख बबलू, तात्या शेख आणि सोहेल शेख सलीम तिघे रा. पिंप्राळा, हुडको यांनी दगडाने मारहाण करून गंभीर दुखापत केली. या घटनेबाबत रईस शेठ बबलू याने रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार मारहाण करणाऱ्या तिघांविरोधात शुक्रवारी ३१ मे रोजी रात्री १० वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content