Home ADVERTORIAL जूना वाद : तरूणाच्या डोक्यात टाकला दगड

जूना वाद : तरूणाच्या डोक्यात टाकला दगड

0
131

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील आकाशवाणी चौकातील वेलनेस मेडिकल जवळ जुन्या वादातून एका तरुणाला शिवीगाळ करत बेदम मारहाण करून डोक्यात दगड टाकून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दोन जणांना विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, वैभव विनोद पाटील वय-२१, रा. पिंप्राळा, जळगाव हा तरुण सोमवारी ९ डिसेंबर रोजी मध्यरात्री तीन महिन्याच्या सुमारास सिनेमा पाहून दुचाकीने आकाशवाणी चौकातील वेलनेस मेडिकल जवळून जात असताना संशयित आरोपी उमाकांत वाघ आणि आकाश पाटील या दोघांनी त्याचा रस्ता आणून त्याला शिवीगाळ करत बेदम मारहाण करून डोक्यात दगड टाकला. दरम्यान या घटनेत विनोद पाटील हा गंभीर जखमी झाला, त्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार घेतल्यानंतर बुधवारी ११ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अजून त्यांनी तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी उमाकांत वाघ आणि आकाश पाटील या दोघांविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल सलीम तडवी करीत आहे.


Protected Content

Play sound