जळगाव प्रतिनिधी । ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 50 हजार रूपये त्वरीत मदत जाहीर करावी, या संदर्भात जळगाव जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटल्याप्रमाणे, गेल्या बऱ्याच दिवसांपासून होत असलेल्या ज्यादाच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे संपुर्ण पिकांचे नुकसान झाले असुन यापूर्वी आपण मदत व पुर्नवसन या शिर्षकाखाली एका पिका प्रमाणे हेक्टरी नुकसानाचे निष्कर्ष लावुन २ हेक्टर पर्यंत भरपाई देत होतो. मात्र या वर्षी संपुर्ण क्षेत्रातील सर्वच पिकांचे उदा. उदीड, मुंग, भुईमुंग, तिळ, सोयाबीन, बाजरी , मका, ज्वारी, कापुस, केळी , भाजीपाला या सर्वाचे संपुर्ण खर्च लावुन परिपक्तेच्या अवस्थेत १०० टक्के नुकसान झाले आहे. त्यामुळे हेक्टरी नुकसानाच्या निष्कर्षात बदल करून सर्व क्षेत्रासाठी व सर्वच पिकांच्या नुकसानाच्या भरपाई म्हणुन मदत हेक्टरी ५० हजार रूपयांची मदत मिळावी तसेच संपूर्ण ७/१२ कोरा करून नविन पिक कर्ज मिळणेबाबत धोरण आखण्यात यावे. तसेच आपल्या जळगाव जिल्ह्यात ज्या पिक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांकडून पिक विमा उतरविला आहे त्या कंपनीचे अधिकाऱ्यांसोबत लवकरात लवकर बैठक घेवुन लोकप्रतिनिधीसह मा.जिल्हाधिकारी साो. जळगाव यांच्या हाय्यदीलनात लावावी ही विनंती. कारण सरकारच्या आव्हानानुसार सरकारच्या अखत्यारीत असलेल्या “आपले कारी सरकार ” या पोर्टल मार्फत शेतकऱ्यांनी पिक विमा रक्कम भरलेली आहे तरी सदरील मदत लवकरात लवकर देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेस युवक जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील, रमेश आबा पाटील, धरणगाव तालुका राष्ट्रवादी युवकाध्यक्ष नाटेश्वर पवार, गजानन पवार, पंकज वाघ, रोहित चव्हाण व बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते.