पिंप्री खुर्द गावात प्रधानमंत्री आवास योजनेच्या कामांची अधिकाऱ्यांकडून पाहणी


धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील पिंप्री खुर्द येथे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे यांनी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर घरकुलांच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी व भेट दिली. ४ मार्च रोजी झालेल्या या पाहणी दौऱ्यात पंचायत समिती धरणगावचे गटविकास अधिकारी अजितसिंग पवार, विस्ताराधिकारी कैलास पाटील, योगेंद्र अहिरे, सतिश कोळी, ग्रामपंचायत अधिकारी सुनील बोरसे, गृहनिर्माण अभियंता दिनेश भदाणे आणि ग्रामपंचायत कार्यकारणी उपस्थित होते.

यावेळी, राजू लोखंडे यांनी सुरू झालेल्या कामांची पाहणी करून घरकुलधारकांशी संवाद साधला. त्यांनी घरकुलधारकांना लवकरात लवकर घरे पूर्ण करण्याचे आवाहन केले. तसेच, घरकुल बांधकामात येणाऱ्या अडचणी आणि समस्यांवर चर्चा करून मार्गदर्शन केले. या पाहणी दौऱ्यात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या घरकुलांच्या कामांना गती देण्यावर भर देण्यात आला. तसेच, घरकुलधारकांना आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन देण्यात आले.