यावल (अय्युब पटेल) । साऱ्या जगासह देशात कोरोना विषाणुच्या संसर्गाने थैमान घातले असुन, अनेकांकांना जिव गमवावे लागले आहेत. या विषाणु संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या वतीने वेळोवेळी विविध आदेश काढण्यात आले.
सर्व नियमांची काटेकोर अमलबजावणी करतांना प्रांत अधिकारी डॉ.अजीत थोरबोले, तहसीलदार जितेन्द्र कुवर आणी यावलचे पोलीस निरिक्षक अरूण धनवडे या अधिकारी वर्गाने प्रशासकीय पातळीवर या जिवघेण्या आजारापासुन नागरीकांना संरक्षण देण्यासाठी अतुलनिय व आपल्या जिव धोक्यात घालुन अहोरात्र परिश्रम घेत खऱ्या अर्थाने लढा दिला. त्यांच्या या कामगिरीचे तालुक्यात कौतुक होत आहे.
यावलचे तहसीलदार जितेन्द्र कुवर यांनी आपल्या कार्यक्षेत्रात लोकांच्या आरोग्य रक्षणासह कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी अनेक उपक्रम राबवले सर्वसामान्य नागरीकांना कायद्याची शिस्त लावणारे आणि नियमांची योग्य अमलबजावणी व्हावी म्हणून शेवटच्या माणसा पर्यंत पोहचून मार्गदर्शन करतांना व प्रसंगी नियमांचे पालन करतांना काहींचा रोष सहन करून घेणारे, आता सध्या कोरोना चाचणी अहवालात पॉझीटीव्ह आलेले यावलचे पोलीस निरिक्षक अरूण काशीनाथ धनवडे यांचा देखील यात मोलाचा वाटा आहे त्यांनी कोरोनाच्या संकटात एकहाती केलेला संघर्ष हे अनेक वर्ष तालुक्याच्या स्मरणात राहील.
यावल, रावेर, फैजपुर अशा तिघ नगर परिषदच्या कार्यक्षेत्रात चोख व कायद्याशीर मार्गदर्शन आणी अमलबजावणीत ज्यांचे कार्य वाखाणण्या सारखेच राहीलेत फैजपुर विभागाचे प्रांत अधिकारी डॉ अजीत थोरबोले यांचे देखील कार्य हे अत्यंत महत्वाचे म्हणावे लागणार आहे. अशा संकटाच्या प्रसंगी नागरीकांच्या आरोग्याच्या रक्षणासाठी अस्मरणीय कार्य करणाऱ्या या खऱ्या अर्थाने कोरोना योद्धांना सलाम.