रेल्वे रुग्णालयात गॅस सिलेंडरचा स्फोट; दोन कर्मचारी जखमी

भुसावळ 1 येथील रेल्वे रुग्णालयातील ऑपरेशन थिएटर मधील एसी मध्ये गॅस रिफिलिंग करत असताना गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना आज दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत दोन कर्मचारी जखमी झाले असून, त्यांचेवर रेल्वे रुग्णालयात उपचार केले जात आहे.

येथिल मध्य रेल्वेच्या रूग्णालयात नियमितपणे एसी मेंटेनन्स चे काम केले जाते. त्यानुसार रेल्वेच्या इलेक्ट्रिकल विभागाचे कर्मचारी हॉस्पिटलमधील ऑपरेशन थिएटर मध्ये बसवण्यात आलेल्या एसी मध्ये गॅस भरण्याचे काम करत होते. मात्र या वेळेस अचानक काहीतरी बिघाड होऊन गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. यामध्ये इलेक्ट्रिक विभागाचे दोन कर्मचारी भाजले गेले असून, त्यांना तात्काळ रेल्वे रुग्णालयातच उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या घटनेबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी विचारणा केली असता, ही घटना दुपारच्या सुमारास घडली असून यात जखमी झालेले कर्मचारी हे धोक्याच्या बाहेर असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे सांगितले.

Protected Content