धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील पाळधी गावात एका तरूणाच्या आयडीवर इंन्टाग्रामवर महापुरूषांबद्दल अवमानकारक व आक्षेपार्ह कमेंट केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीवर धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धरणगाव पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, विशाल सरद नन्नवरे रा. पाळधी ता. धरणगाव यांनी त्यांच्या इंन्टाग्रामच्या अकाऊंटरवर महापुरूषांचा फोटो अपलोड केला होता. या फोटोवर मंगळवार १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता एका अनोळखी व्यक्तीने आक्षेपार्ह व अवमानकारण कमेंट करून जातीय तेढ निर्माण केल्याचा प्रयत्न केला. हा प्रकार घडल्यानंतर विशाल नन्नवरे याने धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे करीत आहे.