धरणगाव (प्रतिनिधी) भाजप कार्यकर्त्याला मारहाणीसह त्याच्या वाहनाची तोडफोड केल्याप्रकरणी जि.प. सदस्य प्रताप गुलाबराव पाटील यांच्यासह २५ ते ३० जणांविरुद्ध धरणगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजपचे तालुका सरचिटणीस किशोर ब्रिजलाल झंवर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मी व माझे सोबत नितेश विलास पाटील (रा. धरणगाव) व गोविंद देवराम सोनवणे (रा. चोरगांव ता.धरणगाव) असे तिघे जण विधानसभा निवडणुकीसाठी उभे असलेले अपक्ष उमेदवार चंद्रशेखर प्रकाश अत्तरदे यांचा प्रचार करत आहोत. दि. 18 ऑक्टोबर रोजी आम्ही तिघे जण जळगाव येथे जाण्यासाठी रात्री 10.30 वा.चे सुमारास निघालो. त्यावेळी असता पाळधी रेल्वे गेटच्या पलीकडे आमची गाडी पाळधी येथील अनोळखी 20 ते 25 लोकांनी अडवून गाडीची तपासणी केली. त्यावेळी आमच्या साडीत प्रचार साहित्य व्यतिरिक्त काहीच नसल्याने त्यांनी गाडी सोडुन दिली. त्यांनतर आम्ही जळगाव येथून काम आटोपुन दि. 19 ऑक्टोबर रोजी पहाटे दीड वाजेच्या सुमारास चोरगांव येथे घरी परत जात होतो. त्यावेळी पथराड रस्त्यावर पाळधी शिवारात पाटाच्या चारीजवळ पाळधी येथील अनोळखी 20 ते 25 लोकांनी पुन्हा माझी गाडी अडवून तपासणी केली. तेव्हाही गाडीत प्रचार साहित्य व्यतिरिक्त काही एक संशयीत वस्तु नव्हती. तरी देखील गर्दीतील एका इसमाने पाळधी येथे कोणाला तरी फोन लावला. नंतर त्याने गर्दीतील लोकांना सांगितले की, मी प्रतापला फोन लावला आहे. त्याने सांगितलेय की, मी मुले पाठवितो, तो पर्यंत गाडी सोडू नका. म्हणून त्यांनी माझी गाडी अडवून ठेवली. थोडयाच वेळात पाळधी कडून दोन इनोव्हा कारमध्ये 7 ते 8 इसम आलेत. तेव्हा त्यांनी व तेथे उभे असलेल्या लोकांनी मला व नितेश विलास पाटील (रा.शेरी ता.धरणगाव) यांना खाली उतरवले. त्यावेळी गोविंद देवराम सोनवणे(रा. चोरगाव ता.धरणगाव) हा घाबरून आंधारात बाजला लपुन बसला होता.
गर्दीतील लोकांनी मला व नितेश विलास पाटील (रा.शेरी ता.धरणगाव) यांना शिविगाळ करुन तूम्ही चंद्रशेखर अत्तरदेचा प्रचार करतात, असे बोलुन राहुल अबादास ठाकुर (रा. पाळधी ता.धरणगाव) याने गर्दीतील लोकांना सांगितले की, या गाडीचा गेम वाजवा. त्यानंतर गर्दीतील लोकांनी आमची गाडी क्र. (एमएच-15 बीएक्स 3813) गाडीची तोडफोड केल्याचे झंवर यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यांतर मला व नितेश विलास पाटील यांना चापटा-बुक्यांनी मारहाण करुन त्यांच्या गाडीत टाकुन पाळधी दुरक्षेत्र येथे आणले. त्याठिकाणी प्रताप गुलाबराव पाटील व आबा माळीसह 10 ते 20 लोकं आधीच उभे होते.
आम्ही गाडीतून खाली उतरल्यानंतर तेथे सुध्दा सर्वांनी मला व नितेश यास चापटा-बुक्यांनी मारहाण केली. तसेच पोलीसांना सांगितले की, ही चंद्रशेखर अत्तरदेची गाडीत दोन ते तीन लाख रुपये घेऊन जात होते. म्हणून आम्ही त्यांना पकडून आणले आहे. तेव्हा पोलीसांनी तात्काळ निवडणुक भरारी पथकाच्या अधिकाऱ्यांना बोलवले. त्यांनी आमच्या गाडीची झडती घेतली असता त्यांना देखील प्रचार साहित्या व्यतिरिक्त काही एक मिळून आले नाही. म्हणुन ते अधिकारी पाळधी दुरक्षेत्र येथुन निघुन गेले. अधिकारी परत गेल्यानंतर पुन्हा प्रताप गुलाबराव पाटील व आबा माळी सह 8/10 लोकांनी चापटांनी मारहाण केली. तसेच यापुढे तुम्ही चंद्रशेखर अत्तरदे यांचा प्रचार करावयाचा नाही. तू गुलाबराव पाटील यांचेच काम करावे. एवढेच नव्हे, तर दम देत तूला 24 तारखे नंतर पाहुन घेऊ, अशी धमकी दिली.या संदर्भात किशोर ब्रिजलाल झंवर यांनी दवाखान्यात उपचार घेतल्यानंतर जि.प. पाटील जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, आबा माळी आणि राहुल ठाकुर यांच्यासह २५ ते ३० जणांविरुद्ध धरणगाव पोलीस स्थानकात रीतसर गुन्हा दाखल केला आहे.