जळगाव प्रतिनिधी । कवीयत्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठातील एमएसडब्ल्यूच्या विद्यार्थ्यांचे पोखरीतांडा येथे निवासी शिबीर नुकतेच पार पडले.
पोखरीतांडा ( ता. धरणगाव ) येथे सात दिवस रासेयोचे निवासी शिबीर घेण्यात आले. यात दररोज विद्यार्थ्यांना मान्यवर वक्त्यांनी मार्गदर्शन केले. यासोबत गावातील बालकांसाठी आरोग्य तपासणी शिबीरदेखील घेण्यात आले. दरम्यान, शिबिराच्या शेवटच्या दिवशी लाईव्ह ट्रेंडस न्यूजचे संपादक शेखर पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक प्रा. पंकज नन्नवरे यांच्यासह दीपक सोनवणे, प्रा. पालखे मॅडम आदींनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला गावातील डिगंबर पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
रासेयोच्या शिबिरार्थी विद्यार्थ्यांनी पोखरीतांडा येथे श्रमदानातून बंधारा तयार केला आहे. शेवटच्या दिवशी उपस्थित मान्यवरांनी याला भेट दिली.
पहा :- पोखरीतांडा येथील रासेयोच्या शिबीराबाबतचा हा व्हिडीओ.
Nice News