भुसावळ प्रतिनिधी । येथील ईसीसी म्हणजेच दि सेंट्रल रेल्वे एम्प्लाईज को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटीच्या निवडणुकीत पुन्हा एकदा एनआरएमयूने बाजी मारली आहे.
ईसीसी सोसायटीच्या निवडणुकीत ३५ पैकी ३० जागांवर नॅशनल रेल्वे मजदूर युनियनने विजय मिळविला. तर तीन जागांवर सीआरएमएस आणि एक जागा ट्रॅकमन असोशिएशनने जिंकली. दरम्यान, बडनेरा येथील जागेचा निर्णय मुंबईत होणार आहे. डीआरएम कार्यालयातील कार्मिक विभागात, निवडणूक निर्णय अधिकारी एन.डी.गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली मतमोजणी झाली. ३५ जागांसाठी १६४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. एनआरएमयू, ऑल इंडीया एससी, एसटी असोशिएशन, सीआरएमएस, ट्रॅकमन असोशिएशन या संस्थांनी आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते.