आता एसटीवर सामाजिक संदेश मराठीतच असतील; परिवहन विभागाचा निर्णय

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | येत्या गुढीपाडवा (मराठी नववर्ष) पासून महाराष्ट्रातील सर्व व्यावसायिक वाहनांवरील सामाजिक संदेश फक्त मराठीत असतील, असा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन विभागाला याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत.

मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले की, मराठी ही महाराष्ट्राची अधिकृत भाषा असून, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळे तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे मराठी भाषेच्या प्रचार व प्रसारासाठी शासनाने पुढाकार घेणे आवश्यक आहे.

राज्यात नोंदणीकृत अनेक व्यावसायिक वाहनांवर हिंदी किंवा इतर भाषांमध्ये सामाजिक संदेश आणि जाहिराती लिहिल्या जातात. उदा. ‘बेटी बचाव, बेटी पढ़ाओ’ याऐवजी ‘मुलगी वाचवा, मुलगी शिकवा’ असा संदेश लिहिण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर (9 एप्रिल 2024) पासून हा निर्णय लागू होईल. महाराष्ट्र परिवहन विभागामार्फत नोंदणीकृत सर्व व्यावसायिक वाहनांवरील सामाजिक संदेश, जाहिराती आणि प्रबोधनात्मक माहिती मराठीतच असावी, असे निर्देश परिवहन आयुक्तांना देण्यात आले आहेत. हा निर्णय मराठी भाषेच्या प्रचार, प्रसार आणि सन्मानासाठी मोठे पाऊल ठरणार आहे, असे मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

Protected Content