आता वीज व पाणी टंचाईला प्राधान्य : उपमुख्यमंत्री

पुणे – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी | उत्तर कोल्हापूरमध्ये मविआच्या एकोप्याने विजय मिळाल्याचे नमूद करत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आता वीज आणि पाणी टंचाईच्या समस्यांचे निवारण करण्याला प्राधान्य असेल असे नमूद केले आहे.

आज पुण्यात पत्रकारांशी बोलतांना अजितदादा पवार यांनी अनेक मुद्यांना स्पर्श केला. ते म्हणाले की, उत्तर कोल्हापूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत  महाविकास आघाडीने  एकत्र काम केल्याने चांगले यश  मिळाले. त्यामुले आमची जबाबदारी वाढली आहे. प्रचारादरम्यान कोण काय बोलले याच्या खोलात न जाता, राज्यातील विजेची  मागणी, उन्हाळ्यामुळे  निर्माण होणारी पाणी टंचाई  यास अग्रक्रम  देऊन काम केले जाणार आहे.

अजितदादा पुढे म्हणाले की, उत्तर कोल्हापुराच्या निवडणुकीत काही वेगळे विषय घेऊन समाजात तेढ निर्माण करून मत मिळविण्याचा प्रयत्न झाला, पण त्याला शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात त्याला थारा मिळाला नाही. सतेज पाटील, हसन मुश्रीफ, राजेश क्षीरसागर यांनी एकत्रपणे काम केले त्यामुळे निवडणूक जिंकली असे त्यांनी नमूद केले. दरम्यान,  आता जयश्री जाधव यांच्यावरील जबाबदारी वाढली आहे, आम्ही त्यास पूर्ण सहकार्य करू. महाराष्ट्रातील विजेची वाढती मागमी, पाणी टंचाई यासह इतर महत्त्वाच्या विषयांना अग्रक्रम देऊन काम करणार आहोत, असेही पवार यांनी सांगितले.

Protected Content