अब हारना और डरना मना है : संजय राऊत

sanjay raut

मुंबई (वृत्तसंस्था) अब हारना और डरना मना है, असे ट्विट करत शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी आपल्या खास शैलीत सरकार स्थापनेचा निर्धार पुन्हा व्यक्त केला आहे.

 

अँजिओप्लास्टी शस्त्रक्रियेनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेले संजय राऊत पुन्हा सक्रिय झाले आहेत. हार हो जाती है, जब मान लिया जाता है. जीत तब होती है, जब ठान लिया जाता है असे या ट्विटमध्ये म्हटले आहे. तर या ट्विटला कॅप्शन देताना ‘अब हारना और डरना मना है…’असेही त्यांनी म्हटले आहे. एखादा तेव्हाच हरतो जेव्हा त्यांनी मी हरलो असे मान्य केलेले असते आणि तेव्हाच जिंकतो जेव्हा तो आपल्या मनाशी निर्धार करतो असे त्यांना ट्विटमधून सुचवायचे आहेत. आता हरणार नाही आणि घाबरणारही नाही असे त्यांनी म्हटले आहे.

Protected Content