महिला बस वाहकाचा असाही प्रामाणिकपणा !

woman bus cunductor

चाळीसगाव प्रतिनिधी । गेल्या १५ दिवसात महत्वाच्या कागदपत्रांसह २५ हजार रूपयांचे दागीने मूळ मालकांना शोधून परत करण्याचा प्रामाणिकपणा महिला बस वाहक सौ. शोभा सुरेश अगोणे यांनी दाखविला असून त्यांचा याबद्दल सत्कार करण्यात आला.

याबाबत वृत्त असे की, काही दिवसांपूर्वी चाळीसगाव आगारातील महिला वाहक सौ. शोभा सुरेश आगोणे यांना चाळीसगाव ते मालेगाव या फेरीवर कार्यरत असताना त्यांना बस मध्ये एक बेवारस लेडीज पर्स सापडली होती. त्यांनी ती प्रामाणिकपणे एसटी अधिकार्‍यांच्या सुपूर्द केली. या पर्स मध्ये सोन्याचे व चांदीचे दागिने होते. जवळपास २५ हजार किमतीचा ऐवज यात होता. याच महिला वाहकाने जळगाव ते चाळीसगाव फेरीवर असतांना दैनिक दिव्यमराठीचे राजहंस यांचे कागदपत्रे देखील पाचोरा आगारात जमा केले. या महिला वाहकाने या पूर्वीही अनेकदा इमानदारीने कर्तव्य पार पाडले असल्याने त्यांचा जळगांव येथे सत्कार आयोजित करण्यात आला होता. एसटी वाहक सौ शोभा आगोणे यांचा जळगाव विभागीय कार्यालयात विभागीय वाहतूक अधीक्षक डी. जी. बंजारा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी गोपाळ पाटील (कामगार सेना), अजमल चव्हाण, खुशाल मोरे, अनिल पाटील, निलेश सपकाळे आदी उपस्थित होते.

Protected Content