डबल मर्डरने हादरला चाळीसगाव तालुका !

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यात आज एकाच दिवशी दोन जणांची क्रूर हत्या करण्यात आल्याच्या घटना घडल्याने परिसर हादरला आहे.

चाळीसगाव तालुक्यातील जामडी व चिंचखेडे शिवरात वेगवेगळ्या घटनेत दोघांचा खून झाला आहे. जामडी गावात आज दुपारी पूर्ववैमनस्यातून दर्ग्यावरील फकीर तबरेश शहा याकूब शहा यांच्या पाठींत चाकून वार करुन, त्यांची हत्या करण्यात आली. तर चिंचखेडे शिवरात ५५ वर्षीय वृध्द राजेंद्र सुकदेव पाटील रा.देवळी यांच्या डोक्यात अज्ञात मारेकर्‍याने लाकडाच्या दांड्याने मारुन, त्याचा खून केला. ह्या घटनामुळे चाळीसगावात एकच खळबळ उडाली असून पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.

जामडी येथील घटनेत पोलिसांनी घटनास्थळावरुन रक्तांने माखलेला चाकू जप्त केला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. दरम्यान, एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांची हत्या करण्यात आल्याने तालुका हादरला आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा या दोन्ही घटनांच्या संदर्भात पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

Protected Content