आता पुन्हा अजित पवारांकडे जावे लागणार ! : राऊतांचा शिंदे गटाला टोला

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | ज्या अजित पवार यांना कंटाळून आम्ही भाजपसोबत गेलो असे मिंधे गट सांगतो, त्यांच्याचकडे आता त्यांना कागद घेऊन जावे लागणार ! अशा शब्दांमध्ये खासदार संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे.

 

आज खासदार संजय राऊत म्हणाले की,  अजित पवारांनाअर्थ खातं सांभाळण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. वैयक्तिक टीका टिप्पणी करण्याचं कारण नाही. पण एक नेते म्हणून अर्थ खातं सांभाळण्याचा, आपल्या नेत्यांना निधी वाटपातून गब्बर करण्याचा त्यांना पूर्ण अनुभव आहे. याच लोकांनी निधी वाटपाच्या कारणावरून अजित पवारांवर आरोप करून शिवसेना सोडली आहे. आता त्यांना अजित पवारांकडे तुम्हाला निधीसाठी कागद घेऊन जावे लागणार आहे, असा हल्लाबोल ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला.

 

याप्रसंगी खासदार संजय राऊत यांनी मंत्रीमंडळाच्या विस्तारावर देखील भाष्य केले. ते म्हणाले की, मंत्रिमंडळाचा विस्तार होईल की नाही हीच शंका आहे. विस्तार करणं या घडीला म्हणजे दोन्ही गटातील असंतोषाचा भडका उडणं आहे. अजित पवार गटातील नेते वजनदार आहेत. त्यांच्यातील अनेकांनी गृहमंत्रीपद, उपमुख्यमंत्रीपद सांभाळलेलं आहे. त्यामुळे त्यांना त्याच तोलामोलाची खाती द्यावी लागले. मिंधे गटातील नेते किरकोळ आहेत. त्यांना चणे, फुटाणे, कुरमुर्‍यावरती भागवले जाईल.

Protected Content