नवी दिल्ली-वृत्तसेवा | नागरिकत्व सुधारणा विधेयक म्हणजेच सीएए कायद्याची अधिसूचना आज जारी करण्यात आली असून पंतप्रधान मोदी यांनी या संदर्भात आज देशाला संबोधित करणार आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या आधी केंद्र सरकार काही महत्वाच्या घोषणा करणार असल्याचे संकेत आधीच मिळाले होते. या अनुषंगाने आज केंद्र सरकारने सीएएची अधिसूचना जारी केल्याची माहिती दिली आहे. हा कायदा संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आधीच संमत करण्यात आला होता. आज याची अधिसूचना लागू करण्यात आला असून यामुळे हा कायदा लागू होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, या संदर्भात पंतप्रधान मोदी हे थोड्या वेळातच देशाला संबोधीत करणार असून ते या कायद्याबाबतची माहिती देणार असल्याची माहिती समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर केंद्राने ही अतिशय महत्वाची घोषणा केल्याचे मानले जात आहे.