निवडणूक खर्च सादर न करणाऱ्या दोघा उमेदवारांना नोटीस

images 2 1

जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रीय जनशक्ती पार्टीचे (सेक्यूलर) उमेदवार शरद गोरख भामरे (सुतार) व अपक्ष उमेदवार ओंकार चैनसिंग जाधव यांना निवडणूक खर्च सादर न करणे, हिशेबात तफावत,  खुलासा सादर न करणे अशा विविध कारणांनी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी  नोटीस बजावल्या आहेत.  संबधितांना आपले म्हणणे सादर करण्याचे सूचित करण्यात आले असून खुलासा सादर न केल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

 

निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांसह उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या प्रत्येक उमेदवाराने तसेच उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवारानेही आपला निवडणूक खर्च सादर करणे व हिशोब तपासणी हजर राहणे बंधनकारक असताना जळगाव  मतदार संघात पुन्हा दोन जण निवडणूक खर्च नोंद वही तपासणीस   गैरहजर राहिल्याने या नोटीस बजावल्या आहेत.  शरद भामरे यांना दिलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, निवडणूक खर्च निरीक्षकांकडे दुसऱ्या व तिसऱ्या तपासणीसाठी कळवूनही  उमेदवारांचे प्रतिनिधी व उमेदवार हजर राहिले नाही. त्या संदर्भात नोटीस देऊनही  खुलासा सादर केला नसल्याने त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्याचा दोन दिवसात खुलासा सादर करावा, अन्यथा गुन्हा दाखल करण्यात येईळ, असा इशाराही दिला आहे. या सोबतच ओंकार जाधव यांना दिलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, निवडणूक खर्च निरीक्षकांकडे  तिसऱ्या  तपासणीसाठी कळवूनही  उमेदवारांचे प्रतिनिधी व उमेदवार हजर राहिले नाही. दोन दिवसात खुलासा सादर न केल्यास कारवाईस पात्र रहाल, असा इशाराही यात देण्यात आला आहे.

 

Add Comment

Protected Content