
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) निवडणूक आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मैं भी चौकीदार’ या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केल्याप्रकरणी दूरदर्शनला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. आयोगाच्या कडक भूमिकेमुळे खळबळ उडाली आहे.
३१ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मैं भी चौकीदार’ हा कार्यक्रम पार पडला होता. या कार्यक्रमातून मोदींनी देशभरातील ५०० ठिकाणच्या लोकांशी थेट संवाद साधला होता. दूरदर्शननेही हा कार्यक्रम दीड तास दाखवला होता. त्याविरोधात तक्रार करण्यात आल्याने निवडणूक आयोगाने दूरदर्शनला नोटीस बजावली आहे.