जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | विधानसभेच्या बैठकीला गैरहजर बंडखोर आमदारांना अपात्रते संदर्भात नोटीस पाठवण्यात आली आहे. यात चोपड्याच्या आमदार लताताई सोनवणे यांनाही नोटीस पाठवण्यात आली आहे.
रविवार, दि. २६ जून रोजी सकाळी आमदार लताताई सोनवणे यांचे पती आमदार चंद्रकांत सोनवणे यांना ही नोटीस प्राप्त झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारलेनंतर यांच्यासोबत अनेक आमदार गेले आहेत. यात जळगाव जिल्ह्यातील पाच आमदारांचा समावेश आहे. जळगाव जिल्ह्यातील बंडखोर पाच आमदारांपैकी चोपड्याचे आमदार लताताई सोनवणे यांनाही अपात्रतेसंदर्भात नोटीस पाठवण्यात आले आहे. लताबाई सोनवणे यांच्या जळगावच्या जयकिसनवाडी येथील निवासस्थानी गेटवर शनिवारी रात्री साडेदहा वाजेनंतर ही नोटीस लटविण्यात आली होती. रविवारी सकाळी ही नोटीस लताताई सोनवणे यांच्या कुटुंबियांना प्राप्त झाली आहेत. नोटीसवर महाराष्ट्र विधानसभा मंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव यांची स्वाक्षरी आहे.
आमदार लताताई सोनवणे यांचे पती माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. आज सकाळी नोटीस मिळाली व त्यावर तत्काळ दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवार, दि. २७ जून रोजी लेखी अभिप्राय करणेबाबत कळविण्यात आले आहे. दरम्यान बंडखोर पारोळा येथील आमदार चिमणराव पाटील यांना ही नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.