भुसावळच्या मुख्याधिकार्‍यांना नोटीस; कारवाईचे संकेत

भुसावळ प्रतिनिधी । नियुक्ती होऊनही पदभार न सांभाळल्यामुळे येथील मुख्याधिकारी रमाकांत डाके यांना जिल्हाधिकार्‍यांनी नोटीस बजावली असून त्यांच्यावर कारवाईचे संकेत मिळाले आहेत.

भुसावळ येथील मुख्याधिकारी करूणा डहाळे यांना कोविडबाबत केलेल्या उपाययोजनांची माहिती व अचूक आकडेवारीला सांगता न आल्यामुळे त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले होते. यानंतर येथील मुख्याधिकारीपदाचा प्रभार अन्य अधिकार्‍यांकडे सोपविण्यात आला होता. तथापि, प्रभारीराजमुळे विकासकामांना खीळ बसल्याने कायमस्वरूपी मुख्याधिकार्‍यांची मागणी करण्यात येत होती. या पार्श्‍वभूमिवर, दिनांन ८ जुलै रोजी रमाकांत डाके यांची येथील मुख्याधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली. ते लागलीच कार्यभार सांभाळणार असल्याचेही सांगण्यात आले होते. तथापि, त्यांनी दोन आठवडे उलटूनही कार्यभार न सांभाळल्याने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यानंतर त्यांनी सबळ कारण न दिल्यास त्यांच्यावर कारवाई होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

Protected Content