रायपूरच्या जिल्हा परिषद शाळेत वह्या वाटप ; विद्यार्थ्यांमध्ये उत्साह !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, रायपूर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांच्या सौजन्याने विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवा उत्साह संचारला होता.

यावेळी व्यासपीठावर माजी जि.प.सदस्य प्रताप पाटील, तालुकाप्रमुख शिवराज पाटील आणि कुसुंबा येथील उपसरपंच प्रवीण पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यांसह गावातील शिवसेना पदाधिकारी, शिक्षक वर्ग आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वतीने शाळेतील सर्व गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. वह्या मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता. या प्रसंगी माजी जि.प.सदस्य प्रताप पाटील यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले आणि भविष्यात यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रमाची गरज असल्याचे प्रतिपादन केले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक चित्रलेखा वायकोळे, कल्पना पाटील, जितेंद्र पवार,  चंद्रलेखा पाटील, वर्षा ठाकरे, मोनिका पाटील,सुचिता पांढरकर, कामिनी पाटील, प्रमोदिनी पाटील, स्वाती पाटील, पुनम परदेशी,आम्रपाली मंडपे, अश्विनी गजभारे, प्रियंका दातीर, प्रियंका निकुंभे,इ शेवटी आभार सुचिता पांढरकर यांनी मानले.

वह्या वाटप झाल्यानंतर गावकरी आणि विद्यार्थ्यांनी प्रताप पाटील यांचे आभार मानले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळालेच, शिवाय त्यांना पुढील अभ्यासासाठी प्रोत्साहनही मिळाले. अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लागतो आणि त्यांना चांगले शिक्षण घेण्यासाठी प्रेरणा मिळते, अशी भावना उपस्थित गावकऱ्यांनी व्यक्त केली.