मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न करूनही कोणत्याच उमेदवाराची मुदतीअखेर माघार झालेली नाही. भाजपासह महाविकास आघाडी त्यांच्या मतावर ठाम राहिल्याने राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून आता चुरस वाढली असून सहाव्या जागेसाठी निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी सकाळीच महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाकडून विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली होती. शिवाय आज दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज माघारीची मुदत होती. दरम्यान दोन्ही बाजूंनी एकमेकांना प्रस्ताव दिले गेले, परंतु स्वीकारले मात्र नाही. त्यामुळे राज्यसभा बिनविरोध ऐवजी निवडणूक होणार असल्याचे निश्चित आहे.
यासंदर्भात राज्यसभेची तिसरा उमेदवार मागे घ्या, त्याऐवजी विधान परिषदेत एक जागा जास्त देऊ असा प्रस्ताव महाविकास आघाडीचा तर तुम्ही राज्यसभेचा दुसरा उमेदवार मागे घ्या विधानपरिषदेची पाचवी भाजपा लढवणार नाही, असा भाजपकडून प्रस्ताव होता. साडेअकरा वाजेनंतर आता तीन वाजेपर्यंत कोणताही संवाद झाला नाही, त्यामुळे राज्यसभा निवडणूक अटळ असून भाजपा तिसरी जागा १०० टक्के जिंकेल, अशी भूमिका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना मांडली.
भाजपा ही निवडणूक जिंकणार याची खात्री
आमच्याकडे ३० मते असून अतिरिक्त १२ मते आमच्याकडे आहेत. आमचा संपर्क झालेला आहे. त्यासाठी वेगळी बैठक बोलावण्याची गरज नाही. आणि अन्य इतर पक्षाच्या उमेदवारांशी संपर्कात नसून ती आमची कार्यपद्धतीही नाही. त्यामुळे अधिकृत मतांच्या व्यतिरिक्तच्या मतांवर सर्व गणित चालेल. शिवाय प्रेफरन्शियल वोटिंग आहे. ४१.०१ असा कोटा असून प्रस्थापित पक्षाच्या आमदाराला त्याच्या प्रतोदाला ते मत दाखवावे लागते. आणि तसे पहिले तर पुरेसे संख्यबळ त्यांच्याकडे देखील नाही. कॉमन मतांसाठी दोघेही प्रयत्न करतील. इतिहासात असे अनेक दाखले आहेत की पहिल्या क्रमांकाची मते कोणाला जास्त आणि कुणाला कमी. तरी कमी मते असलेला उमेदवारही जिंकून आला आहे. या पद्धतीत एका मताचा एक दशांश इथपर्यंत मोजण्याची पद्धत असल्यामुळे भाजपा ही निवडणूक जिंकणार याची खात्री असल्याचेहि चंद्रकांत पाटील म्हणाले.