मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आगामी लोकसभा निवडणूकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून सुरूवात झाली आहे. दुसऱ्या टप्प्यासाठी ४ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी २६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. महाराष्ट्रातील ८ लोकसभा मतदारसंघात यावेळी मतदान होणार आहे. त्यात परभणी, नांदेड, हिंगोली, बुलढाणा, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, अकोला या मतदारसंघाचा समावेश आहे.
दरम्यान उमेदवारांनी लोकसभा निवडणुकीचे आर्थिक व्यवहार करण्यासाठी स्वतंत्र बँक खाते नव्याने उघडावे. हे खाते उमेदवाराला स्वत:चे नावे किंवा निवडणूक प्रतिनिधीसोबत संयुक्तरित्या काढता येईल. सदर बँक खाते नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या किमान एक दिवस अगोदर उघडलेले असणे आवश्यक असून यात केवळ निवडणुकीशी संबंधीतच व्यवहार करायचे आहेत.