राज्यात लॉकडाऊनचा विचार नाही – राजेश टोपे

मुंबई- राज्यात नव्या कोरोनाचा संसर्ग झालेला एकही रुग्ण सापडलेला नाही. पण गाफिल राहून चालणार नसल्याचे बजावत राज्यात पुन्हा लॉकडाऊन लावण्याचा विचार नसल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज स्पष्ट केले आहे.

आरोग्य मंत्री राजेश टोपे आज म्हणाले की, ब्रिटनमधून आलेल्या प्रत्येक प्रवशांचा स्वॅब घेऊन त्यांना क्वॉरंटाईन केलं जात आहे. आतापर्यंत ४३ जणांचे सँपल घेण्यात आले आहेत. सरकार अत्यंत गंभीरपणे या प्रकरणात लक्ष घालत आहे. कोणताही निष्काळजीपणा केला जात नाही, असंही त्यांनी सांगितलं. देशात नव्या कोरोनाचा संसर्ग झालेले काही रुग्ण सापडले आहेत. पण महाराष्ट्रात अजूनतरी नव्या कोरोनाचा संसर्ग झालेला रुग्ण सापडलेला नाही. महाराष्ट्रात कोणीही इन्फिल्टेड झालेलं आढळलेलं नाही. पण आम्ही पूर्ण खबरदारी घेत आहोत, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.

दरम्यान, राज्यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आहे. लोक मास्क लावत असून सोशल डिस्टन्सिंगचे नियमही पाळत आहेत. त्यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याचा विचार नाही. मात्र, नागरिकांनी गाफिल राहू नये. गर्दी करू नये आणि गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. सरकारने दिलेल्या नियमांचं काटेकोर पालन करावं, असंही ते म्हणाले.

Protected Content