विधानपरिषदेत ना. गुलाबराव पाटील व दानवेंमध्ये संघर्ष

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आज विधानपरिषदेत पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यात जोरदार धुमश्‍चक्री दिसून आली.

पावसाळी अधिवेशनामध्ये पहिल्या दिवपासूनच ठाकरे आणि शिंदे गटात मोठ्या प्रमाणात संघर्ष दिसून आला आहे. आज विधानपरिषदेत हेच चित्र दिसून आले. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यामध्ये सभागृहात जोरदार खडाजंगी झाली. दानवे यांनी आक्रमकपणे मुद्दा मांडला. यावर दादागिरी केली जाईल तशी भाषा असेल तर आम्हाला ही उत्तर देता येईल असे गुलाबराव पाटील म्हणाले. त्यांच्या या विधानावर दानवे यांनी आक्षेप घेऊन पाटील यांनी माफी मागण्याची मागणी केली.

दरम्यान, विधानपरिषदेत हा गोंधळ सुरू असतांना उपसभापती निलम गोर्‍हे यांनी सुध्दा ना. गुलाबराव पाटील यांना फटकारत तुम्ही मंत्री असाल तुमच्या घरी असे म्हटल्याने पुन्हा गोंधळ उडाला. यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. तथापि, विरोधी पक्षातील आमदारांनी लॅाबीमध्ये येऊन घोषणाबाजी केली.

 

Protected Content