यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल येथील एकात्मिक आदिवासी विकास विभाग प्रकल्प कार्यालया अंतर्गत मागील दोन वर्षापासुन प्रलंबीत राज्य शासनाच्या वतीने सन २०२२ व २३ पासुनच्या स्वाभीमान सबलीकरण योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यातील बऱ्याच शेतकरी बांधवांनी शेतजमीन विक्री करीता अर्ज कार्यालयात जमा केले असुन , काही शेतकऱ्यांची शेत जमीनची चौकशी व पंचनामे हे प्रलंबीत असुन याबाबत प्रकल्प कार्यालयाच्या वतीने तात्काळ कार्यवाही करीत शासन निर्णयानुसार आदिवासी बांधवांना निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी प्रकल्प अधिकारी यांच्या कडे आदिवासी लाभार्थी बांधवांच्या वतीने निवेदनद्वारे करण्यात आली आहे.
या संदर्भात आदिवासी समाज बांधवांनी आदिवासी प्रकल्प कार्यालयात सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रशांत माहूरे यांची भेट घेत त्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या वतीने प्रकल्प अधिकारी अरूण पवार यांनी २८ फेब्रुवारी रोजी दोन महीन्याच्या आत स्वाभिमान सबलीकरण योजनेच्या लाभार्थ्यांना निधी उपलब्ध करीत योजनेचा लाभ मिळवुन देवु असे आश्वासन दिले होते . याबाबत वढोदा तालुका यावल येथील अर्जदार यशवंत शालीक अहिरे यांच्यासह ईतर लाभार्थ्यांनी निवेदनात म्हटले आहे की शासन निर्णयानुसार जमीन विक्रीसाठी अर्ज भरून कार्यालयात दिले असुन , अद्याप आपल्या कार्यालयाच्या वतीने कोणत्याही प्रकारची चौकशी अथवा कार्यवाही झालेली नसल्याने संबंधीत लाभार्थ्यांना मागील दोन वर्षापासुन निधी उपलब्ध होत नसल्याकारणाने काही आदिवासी बांधवांनी आपली शेतजमीन शेतकऱ्यांनी खाजगी लोकांना विकुन टाकल्या असेल तर अशा शासन निर्णयचा काय फायदा असे ही निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान विश्वास लोटन पाटील, राहणार आचळगाव तालुका भडगाव , भुषण मधुकर पाटील , राहणार पिंपळखेडा तालुका भडगाव, लिलाबाई कमलाकर ठाकरे, राहणार वरणगाव साकरी शिवार तालुका भुसावळ , सुनिता राजेन्द्र पाटील, राहणार लोनसिम तालुका अमळनेर , कल्पनाबाई मोतीलाल भोई , राहणार मुडी बोदर्डै तालुका अमळनेर, भैरत राजधर कोळी , राहणार अमळनेर आणि दिपीका अरुण बारी, राहणार यावल पिंप्री शिवार या सात शेतकरी बांधवांच्या शेतजमिनीची तात्काळ चौकशी व पंचनामे करून तात्काळ वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात यावे व निधी वितरीत करीत कार्यवाही पुर्ण करून वंचीत व गरजु आदिवासी बांधवांना शेतजमीन वाटप करण्यात यावी व आदिवासी समाज बांधवांना न्याय मिळुन द्यावा अशी मागणी सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रशांत माहुरे यांना देण्यात आलेल्या निवेदनावर यशवंत अहिरे, सदाशिव भिल, मंगल आंनदा भिल, भिकार मंश भिल, गोरख पांडुरंग ठाकरे, भास्कर भिल, सुनिल जगन भिल यांच्या निवेदनावर स्वाक्षरी आहेत.