जळगाव, प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या केंद्रीय प्रशिक्षण व नियुक्ती कक्षातंर्गत लर्न फटाफट डॉट कॉम (LearnFatafat. com) या कंपनीद्वारा घेण्यात आलेल्या परिसर मुलाखतीद्वारे सागर कोळी या विद्यार्थ्याची निवड करण्यात आली.
लर्न फटाफट डॉट कॉमतर्फे विद्यार्थ्यांसाठी परिसर मुलाखतीचे आयोजन १५ आक्टोबर रोजी करण्यात आले होते. या कंपनीद्वारा विद्यार्थ्यांना विविध ऑनलाईन आणि ऑफलाईन अभ्यासक्रमाद्वारे जलद शिवण्याचा अनुभव देते व शिवाय विद्यार्थ्यांच्या अकालन शक्ती वाढवते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा शिक्षणावरील खर्च वाचवणे ई लंर्निग व शिक्षणास भारतातील प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविणे लर्न फटाफट डॉट कॉमचे उद्दिष्ट आहे. विद्यापीठातील विविध प्रशांळातील एम.एस्सी. अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती लर्न फटाफट डॉट कॉमचे संचालक तथा व्यवस्थापक पंकज छाजेड, प्रॉडक्शन हेड सुरभी निगम, बिझीनेस डेव्हलपमेंटचे हेड सागर वाणी यांनी घेतल्या. मुुलाखतीत सागर रामभाऊ कोळी या विद्यार्थ्याची निवड करण्यात येऊन नियुक्तीपत्र देण्यात आले. निवड झालेल्या सागर कोळी या विद्यार्थ्याचे कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील, प्र-कुलगुरु प्रा.पी.पी.माहूलीकर, कुलसचिव भ.भा.पाटील, केंद्रीय प्रशिक्षण व नियुक्ती कक्षाचे समन्वयक डॉ. भूषण चौधरी यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.