जळगाव प्रतिनिधी । बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील कंत्राटी कर्मचार्यांनी आजपासून सेवेत सामावून घेण्यासाठी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या स्थापनेपासून कार्यरत असणार्या कर्मचार्यांनी आपल्याला सेवेत सामावून घेण्याची मागणी कधीपासूनच केली आहे. याबाबत अनेकदा पाठपुरावादेखील करण्यात आलेला आहे. तथापि, त्यांच्या मागणीकडे आजवर दुर्लक्ष करण्यात आले आहे. वास्तविक पाहता यासाठी नेमण्यात आलेल्या समितीने या ५६ कर्मचार्यांना सेवाज्येष्ठतेनुसार शासकीय सेवेत सामावून घेण्याची शिफारस केली असली तरी याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही.
या पार्श्वभूमिवर, कंत्राटी कर्मचार्यांनी आज सकाळपासून विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराजवळ बेमुदत उपोषण सुरू केले आहे. आपली मागणी पूर्ण होईपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार या कर्मचार्यांनी केला आहे.
खालील व्हिडीओत पहा– उपोषणास बसलेले विद्यापीठातील कर्मचारी काय म्हणतात ते !