Home Uncategorized ‘निवेश महामंथन २०२५’ : शेअर बाजारावर एकदिवसीय संमेलन

‘निवेश महामंथन २०२५’ : शेअर बाजारावर एकदिवसीय संमेलन


जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी :  द इंस्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) जळगाव शाखेच्या वतीने “निवेश महामंथन २०२५ – Unlocking Secrets of Capital Markets” या विषयावर शनिवारी (11 ऑक्टोबर ) रोजी एकदिवसीय संमेलन घेण्यात आले. हे संमेलन जिल्हा नियोजन भवनात पार पडले

“निवेश महामंथन २०२५’ हे संमेलन कमिटी ऑन फायनान्शियल मार्केट्स ॲन्ड इनवेस्टर प्रोटेक्शन (CFMIP) आय.सी.ए. आय. नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. या संमेलनांत वित्तीय साक्षरता, गुंतवणूकदार शिक्षण व कॅपिटल मार्केट्समधील नवनवीन प्रवाहांविषयी जागरूकता निर्माण करण्यात आली.

या परिषदेचे आयोजन जळगाव सी.ए. शाखेचे अध्यक्ष सी.ए. हितेश अगीवाल यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. या परिषदेत वित्तीय बाजारपेठांचे विविध पैलू, गुंतवणुकीतील पारदर्शकता, बाजारातील संधी व जोखीम व्यवस्थापन या विषयांवर तज्ञांनी मते मांडली. या परिषदेमध्ये वेगवेगळ्या सत्रात मार्गदर्शन करण्यासाठी विकास सेठी (झी बिजिनेस चॅनेल), सी.ए. विजय मंत्री, सी.ए. आशिष बाहेती (सीएनबीसी आवाज चॅनेल), सी. ए. देवेश खिवसरा, सी.ए. सौरभ अजमेरा, व सी.ए. अभिनव शर्मा या प्रमुख वक्ते उपस्थित होते. जळगाव सी.ए. शाखेने गेली 38 वर्षे सातत्याने व्यावसायिक विकासासाठी कार्य केले असून, ही परिषद त्या परंपरेचा पुढील टप्पा ठरणार आहे.


Protected Content

Play sound