Home Cities जळगाव निवडणूक लढविणाऱ्‍या उमेदवारांची उद्या केंद्रीय निरिक्षक बैठक

निवडणूक लढविणाऱ्‍या उमेदवारांची उद्या केंद्रीय निरिक्षक बैठक


जळगाव प्रतिनिधी । लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2019 साठी जळगाव लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविणाऱ्‍या उमेदवारांची बैठक केंद्रीय निवडणूक निरिक्षक सोमवार 8 एप्रिल 2019 रोजी सायंकाळी 5 जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात घेणार आहे.

या बैठकीत जळगाव लोकसभा मतदार संघासाठी निवडणूक लढविणा-या सर्व उमेदवारांना निवडणूक निरिक्षक निवडणूक विषयक विविध विषयांवर महत्त्वाचे मार्गदर्शन करणार आहेत. तरी सर्व उमेदवार अथवा त्यांचे निवडणूक प्रतिनिधी यांनी वेळेवर उपस्थित रहावे. असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जळगाव लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound