दहावीच्या परिक्षेत ८९.८० टक्के मिळवून निशा शाळेत अव्वल

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  तालुक्यातील धार येथील एस. एस. पाटील माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनी निशा किशोर मिस्तरी हिने,इयत्ता दहावीच्या परीक्षेत ८९.८० टक्के गुण प्राप्त करून शाळेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन यश संपादन केले आहे.

 

 

निशा मिस्तरी हिचे दहावीचे वर्ष असताना च वडीलांचा  अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता ;अशातच तिचे पितृछत्र हरपले परंतु अशाही परिस्थितीत तिने न डगमगता अहोरात्र मेहनत, व अथक परिश्रमच्या जोरावर दहावीच्या परीक्षेत मोठे यश संपादन केले.व शाळेत प्रथम क्रमांक पटकावला.घरची परिस्थिती हलाखीची असताना व वडिलांचे पितृ छत्र हरपले असे असताना देखील तिने हे यश मिळवित तिचे व कुटुंबाचे नाव लौकीक केले आहे. या यशाबद्दल तिचे, संस्थेचे अध्यक्ष गणेश धोंडू पाटील, सन्मानिय सर्व संचालक, मंडळ शाळेचे मुख्याध्यापक उमाकांत गिरीधर साळुंखे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर मंडळींनी  कौतुक केले.तसेच गावातील ग्रामस्थांनी देखील तिच्या या जिद्दीच कौतुक व अभिनंदन केले आहे.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!