नवी-दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अर्थसंकल्प सादर करणार असून याकडे देशाचे लक्ष लागले आहे.
देशाचा अर्थसंकल्प आज मांडला जाणार असून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण नॉर्थ ब्लॉकमध्ये दाखल झाल्या आहेतलवकरच अर्थमंत्री निर्मला सीतारमण २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर करतील. देशवासियांचे या अर्थसंकल्पाकडे लक्ष लागले आहे. या अर्थसंकल्पात काय असणार याची उत्सुकता लागली आहे. दरम्यान, सीतारामन टॅक्सचं लिमिट वाढवणार की सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
दरम्यान, यंदा मोदी सरकार टॅक्स स्लॅबमध्ये बदल करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. टॅक्स स्लॅबमध्ये सूट मिळून जवळपास ८ वर्षे झाली आहेत. २०१४ मध्ये मोदी सरकारने टॅक्सची मर्यादा २ लाख रुपयांवरून २.५ लाख रुपये केली होती. तर ६० वर्षांवरील आणि ८० वर्षांखालील ज्येष्ठ नागरिकांसाठी करसवलतीची मर्यादा अडीच लाखांवरून तीन लाख रुपये करण्यात आली होती. यानंतर कोणतीही सवलत मिळालेली नाही. यामुळे यंदा दरी सवलत मिळणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.