जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून सतत पडत असलेल्या पाऊसामुळे जिल्ह्यातील सरासरी पर्जन्यमानाने वार्षिक सरासरीची नव्वदी पार केली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत वार्षिक सरासरीच्या 90.1 टक्के इतका पाऊस पडला आहे. जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान 663.3 मिलीमीटर इतके असून मागील वर्षी 9 सप्टेंबर, 2018 पर्यंत वार्षिक सरासरीच्या फक्त 63.0 टक्के म्हणजेच 417.6 मिलीमीटर इतका पाऊस पडला होता. तर यावर्षी मात्र 517.8 मिलीमीटर इतका पाऊस पडला आहे.
जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीचा विचार केला असता आजपर्यंत सर्वाधिक 108.6 टक्के इतका पाऊस रावेर तालुक्यात पडला असून सर्वात कमी म्हणजेच 72.9 टक्के पाऊस चाळीसगाव तालुक्यात पडला आहे. काल (8 सप्टेंबर) जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे एका दिवसात वार्षिक सरासरीच्या 12.9 मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात तालुकानिहाय आजपर्यंत (9 सप्टेंबर, 2019) पडलेला पाऊस मिलीमीटरमध्ये कंसात (वार्षिक सरासरीशी टक्केवारी) जळगाव तालुका- 598.7 मिलीमीटर (87 टक्के), जामनेर- 673.2 मि.मी.,(93.3), एरंडोल- 563.6 मि.मी. (90.4), धरणगाव- 534.2 मि.मी. (85.7), भुसावळ- 638.1 मि.मी. (95.4), यावल- 715.1 मि.मी. (102.5), रावेर- 725.9 मि.मी. (108.6), मुक्ताईनगर – 613.6 मि.मी. (98), बोदवड- 599.7 मि.मी. (89.6), पाचोरा – 601 मि.मी. (80.8), चाळीसगाव- 481.3 मि.मी. (72.9), भडगाव- 526.6 मि.मी. (78.6) अमळनेर- 511.7 मि.मी. (87.9), पारोळा- 533.4 मि.मी. (86.5), चोपडा- 657.7 मि.मी. (94.1) याप्रमाणे जिल्ह्यात आजपर्यंत एकूण वार्षिक सरासरीच्या 90.1 टक्के पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.