पारोळा : प्रतिनिधी । तालुक्यातील करंजी येथील 80 वर्षीय निंबा रोकडे यांनी कोरोनावर मात केली आहे कोरोना टेस्ट पॉझीटिव्ह आल्यावर त्यांना कुटीर रुग्णालय पारोळा येथे सरपंच भैयासाहेब रोकडे व नातेवाईक यांच्या मदतीने दाखल केले होते
कुटीर रुग्णालय येथील वैद्यकीय अधिकारी योगेश साळुंखे यांच्या टीमने निंबातात्या यांच्यावर उपचार केले
निंबातात्या यांनी सांगितले कि कोरोना झाल्यावर मला भीति वाटली नाही मनात होत की आपण कोरोना आजाराला घालऊ शकतो नातेवाईक , मूल , नातू यांचा खुप मोठा आधार होता त्यामुळे आज मी घरी परतलो .निंबा तात्या घरी परतले तेव्हा त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी करंजीचे सरपंच भैयासाहेब रोकडे, माजी सरपंच बी . एस . पाटील , शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष विलास रोकडे, राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष योगेश रोकडे , नाना माउली , नागो माळी , निंबा माळी , संदीप रोकडे , प्रवीण बडगुजर, आशा वर्कर कल्पना महाजन, नंदु रोकडे आदी उपस्थित होते