Home क्रीडा भारतीय संघाचा दारूण पराभव

भारतीय संघाचा दारूण पराभव

0
46

वेलींग्टन । आजच्या एक दिवसीय क्रिकेट सामन्यात यजमान संघाने टिम इंडियाचा आठ गडी राखून दारूण पराभव केला.

भारतीय संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तथापि, बोल्टने केलेल्या भेदक मार्‍यामुळे भारताचा डाव फक्त ९२ धावांमध्ये संपुष्टात आला. विराट व धोनीच्या अनुपस्थितीत खेळणार्‍या भारतीय संघाने साफ निराशा केली. किवीजचा वेगवान गोलंदाज टे्रंट बोल्ट याच्या भेदक मार्‍यासमोर कुणीही भारतीय फलंदाज टिकाव धरू शकला नाही. त्याने पाच बळी टिपले. यामुळे भारताचा डाव अवघ्या ९२ धावांमध्ये आटोपला. अतिशय माफक आव्हान घेऊन उतरलेल्या यजमान संघाने फक्त दोन गड्यांच्या मोबदल्यात विजय संपादन केला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound