जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | स्थानिक गुन्हा शाखा अर्थात एलसीबीच्या तात्पुरत्या प्रमुखपदाची धुरा याच शाखेतील सहायक पोलीस निरिक्षक जालिंदर पळे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
एलसीबीचे तत्कालीन निरिक्षक किरणकुमार बकाले यांनी केलेल्या आक्षेपार्ह टिपण्णीनंतर त्यांची आधी बदली तर नंतर निलंबन करण्यात आले. यानंतर त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल करण्यात आले. परवा सायंकाळी त्यांच्या पदाचा तात्पुरता कार्यभार हा पाचोरा येथील निरिक्षक किसनराव नजन-पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला. तर काल सायंकाळी हा निर्णय बदलून त्यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली. या संदर्भातील निर्देशात आयजी बी.जी. शेखर पाटील यांनी एलसीबीच्याच दुसर्या फळीतील अधिकार्याकडे याचा तात्पुरता कार्यभार द्यावा असे निर्देश दिले होते.
या अनुषंगाने एलसीबीच्या शाखेत कार्यरत असणारे सहायक पोलीस निरिक्षक जालिंदर पळे यांच्याकडे स्थानिक गुन्हा शाखेचा कार्यभार सुपूर्द करण्यात आला आहे. त्यांच्याकडे या पदाची तात्पुरती जबाबदारी असून नियमीत एलसीबी प्रमुख येईपर्यंत ते या पदावर काम सांभाळणार आहेत. रात्री उशीरा याबाबतचे आदेश निर्गमीत करण्यात आले.