जळगाव प्रतिनिधी | जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाच्या आधुनिक दूध शीतकरण आणि दूध प्रक्रिया प्लांटचे लोकार्पण आज उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या हस्ते आणि पालकमंत्री व अन्य लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत करण्यात आले.
उपमुख्यमंत्री ना. अजीत पवार, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्यासह मान्यवरांचे जिल्हा दूध संघातर्फे जोरदार स्वागत करण्यात आले. यंदा दूध संघाच्या स्थापनेचा सुवर्ण महोत्सव असून याच्या प्रित्यर्थ दोन्ही मंत्र्यांच्या हस्ते हवेत फुगे सोडण्यात आले. यानंतर उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांनी संयुक्तपणे नवीन प्रकल्पाचे लोकार्पण केले. यात पाच लाख लीटर क्षमतेच्या नवीन दूध प्रक्रिया प्लांट आणि नवीन दुग्धजन्य पदार्थ उत्पादन युनिटचे उदघाटन करण्यात आले. यासोबत श्रीखंड, लस्सी आणि पनीर, सुगंधी गोड दूध पॅकींग सयंत्राचे उदघाटन देखील याप्रसंगी करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री एकनाथराव खडसे होते. तर प्रमुख उपस्थितांमध्ये खासदार रक्षाताई खडसे, आमदार शिरीषदादा चौधरी, आमदार अनिल भाईदास पाटील, महापौर जयश्री सुनील महाजन, आमदार लताताई सोनवणे, माजी विधानसभाध्यक्ष अरूणभाई गुजराथी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील, माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, माजी मंत्री तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर, माजी खासदार ईश्वरबाबूजी जैन, जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा रोहिणी खडसे, माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील, यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी जिल्हा दूध संघाच्या चेअरमन मंदाताई खडसे, प्रभारी चेअरमन वसंतराव मोरे, कार्यकारी संचालक मनोज लिमये, संचालक आमदार चिमणराव पाटील, आमदार किशोरआप्पा पाटील, हेमराज चौधरी, डॉ. संजीव पाटील, जगदीश बढे, प्रमोद पाटील, अशोक चौधरी, सुभाष टोके, अशोक पाटील, शामल झांबरे, मधुकर राणे, प्रल्हाद पाटील, पूनम पाटील, सुनीता पाटील, भैरवी पलांडे-वाघ, श्रावण ब्रह्मे अनिल हातेकर यांची उपस्थिती होती.
खालील व्हिडीओत पहा दूध संघाच्या प्लांटचा लोकार्पण सोहळा
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/221754400107989