नवी दिल्ली वृत्तसंस्था । आधीच कोरोनाच्या नवीन प्रकारामुळे त्रस्त झालेल्या ब्रिटनमध्ये याच विषाणूचा नवीन आणि आधीपेक्षा घातक प्रकार आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा दुसरा नवीन प्रकार आढळून आल्यामुळे लॉकडाऊन लावण्यात आलेला आहे. यातच आता कोरोनाचा तिसरा स्ट्रेनही समोर आला आहे. कोरोनाचा नवा स्ट्रेन जुन्या रुपांपेक्षा अधिक घातक असल्याचं बोललं जातं. जुन्या अवतारांच्या तुलनेत हा वेगाने पसरत असल्याचे शास्त्रज्ञांना दिसून आले आहे.
कोरोनाचा हा नवीन स्ट्रेन दक्षिण आफ्रिकेतून आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे दक्षिण आफ्रिकेहून परत आलेल्या नागरिकांनी तातडीने स्वतःला आयसोलेट करावे, असं आवाहन ब्रिटनच्या आरोग्य सचिवांनी केलं आहे. त्याच्या संसर्गाचा वेग अधिक जास्त आहे. यामुळे आता ब्रिटनमध्ये जास्त काळजी घेतली जात असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.