हार्ट ऑफ गोल्ड ! : रतनलाल सी बाफना ज्वेलर्सचा कोरोना योध्द्यांना सलाम

जळगाव प्रतिनिधी । येथील रतनलाल सी बाफना ज्वेलर्सतर्फे कोरोना योध्द्यांच्या कार्याचा गौरव म्हणून हार्ट ऑफ गोल्ड ही वृत्त मालिका सुरू करण्यात आली आहे. यात या विषाणूच्या प्रतिकारासाठी अहोरात्र झटणार्‍यांची संघर्षकथा आपल्याला अनुभवता येणार आहे. लाईव्ह ट्रेंडस न्यूजवरून ही मालिका खास आपल्यासाठी सादर करत आहोत.

जळगावच्या गोल्ड मार्केटमधील ख्यातनाम नाव असणारे रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स हे आपल्या सामाजिक जाणिवेसाठी ख्यात आहे. या अनुषंगाने आता हार्ट ऑफ गोल्ड हा उपक्रम राबविण्यात येत आहे. याबाबतची भूमिका बाफना ज्वेलर्सचे संचालक सुशील बाफना यांनी एका निवेदनाच्या माध्यमातून जाहीर केली आहे.

यात सुशील बाफना यांनी म्हटले आहे की, आज प्रत्येक व्यक्ती कोरोनाच्या दहशती खाली वावरतो आहे. जग थांबल्या सारखं झालंय.रोजच्या कोरोना संबंधिच्या विविध भयावह बातम्या वाचून, पाहून किंवा ऐकून तो निराश होतोय. इतकंच काय,तर आज त्याचा स्वतः वरचा विश्‍वासच कमी होतोय.

काय म्हणावं या कोरोनाला? दहशत एवढी आहे कि,माणूस कोविड रुग्णालयाजवळून जायलाही घाबरतो,अनेक जण रस्ता बदलून जातात तर काही वाहन रुग्णालयाजवळ येताच असा वेग वाढवतात की,जसं काही कोरोना वेताळासारखा उडी घेऊन मानगुटीवर बसणार आहे.

सुशील बाफना यांनी पुढे म्हटले आहे की, आजच्या या कोरोना विरुद्धच्या लढाईत काही असामान्य लोक आहेत,जे स्वतः जीव धोक्यात घालून या कोरोना युद्धात खंबीरपणे लढा देत आहेत, कोरोना बाधितांना मदत आणि बळ देत आहेत व सर्वात महत्त्वाचं समाजात सकारात्मकतेच संतुलन टिकवण्याचे महत्त्वाचं कार्य ते करीत आहेत.

अश्याच काही प्रेरक, सकारात्मक, कर्तबगार योद्धयांचा अभिमान असायलाच हवा,आणि म्हणूनच… हार्ट ऑफ गोल्ड ही कोरोना योद्धांची प्रेरक कहाणी आपल्यासमोर आणण्याचा हा एक छोटासा प्रयत्न रतनलाल सी.बाफना ज्वेलर्सचा आहे. आपणही त्यांना कमेंट करून त्यांच्या कार्याला सॅल्युट करू शकता व आपल्या परिचयातील जर अशी कुणी व्यक्ती असेल तर त्याची माहिती अथवा संपर्क क्रमांक आम्हाला ७७६९८८८८४५ या नंबरवर पाठवू शकता, जेणेकरून या मालिकेत त्यांचा यथोचित सन्मान करण्याचे आम्हाला सदभाग्य लाभेल असे आवाहन त्यांनी केले आहे.

याबाबतची अधिक माहिती आपण खालील लिंकवर मिळवू शकतात.

https://www.facebook.com/RCBafnaJewellers

Instagram : https://www.instagram.com/rcb_jewellers

 

r. c. bafna jalgaon, r c bafna jalgaon gold rate today, gold price jalgaon, gold price today jalgaon, gold rate today jalgaon, gold rate today in jalgaon

Protected Content