यावल तालुका केमिस्ट असोसिएशनची नुतन कार्यकारणी जाहीर

अध्यक्षपदी अनिरूध्द सरोदे उपाध्यक्षपदी संजय चौधरी व मनिष कवठळकर यांची निवड

यावल-लाईव्ह ट्रेंड न्यूज प्रतिनिधी । यावल तालुका केमिस्ट असोसिएशनची नुतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली असुन तालुका अध्यक्षपदी अनिरुद्ध सरोदे यांची तर उपाध्यक्षपदी संजय त्र्यंबक चौधरी आणी सचिवपदी प्रशांत अशोक कासार यांची निवड करण्यात आली आहे.

 

यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात केमिस्ट असोसिएशनचे जळगाव जिल्ह्यध्यक्ष सुनिल भंगाळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या संस्थेच्या सर्वसाधारण वार्षीक सभेत संस्थेच्या वतीने ऑनलाईन व इतर येणाऱ्या विषयांवर तसेच शेतकरी कार्डाबद्दल आणी जनेरीक दुकानातील इथीकल व ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या डिस्काउंट बद्दल आणी केमिस्ट बांधवांच्या अडीअचणी संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.

 

यावेळी संस्थेच्या वतीने येणाऱ्या २०२३ते २०२६या तिन वर्षाच्या कार्यकाळासाठी यावल तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यात तालुका अध्यक्षपदी अनिरूध्द सिताराम सरोदे, उपाध्यशपदी संजय त्र्यंबक चौधरी, मनिष गुलाबराव कवठळकर  तर सचिवपदी प्रशांत अशोक कासार, कोषाध्यक्षपदी भानुदास देविदास महाजन, सहसचिव निलेश वासुदेव चौधरी, सहकोषाध्यक्षपदी मलक अब्दुल बिलाल मलक सत्तार , संघटन सचिव राजेश जयरामदास मखीजा, सहसंघटन सचिव सुनिल प्रकाश महाजन आणी छाया अतुल पाटील, पीआरओ ललित त्र्यंबक कोळी , सहपीआरओ सोहेल अहमद रफीक यांची निवड करण्यात आली आहे. बैठकीचे सुत्रसंचलन अनिरूध्द सरोदे यांनी केले तर उपस्थितांचे आभार सचिव प्रशांत कासार यांनी मानले.

Protected Content