पाचोरा वकील संघाची नूतन कार्यकारिणी घोषीत

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा वकील संघाची नूतन कार्यकरिणी नुकतीची घोषीत करण्यात आली आहे. वकील संघाचे अध्यक्षपदी अॅड. प्रवीण पाटील, उपाध्यक्षपदी कविता मासरे (रायसाकडा) तर सचिव पदी अॅड. निलेश सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली आहे.

यावर्षी प्रथमच महिला भगिनीस उपाध्यक्षपदाची संधी देण्यात आली. अध्यक्षपदाची निवडणूक झाली असली तरी मात्र सर्व वकील मंडळी व महिला वकील मंडळी यांनी कविता मासरे (रायसाकडा) यांना बिनविरोध करून एक चांगला नियम पाळण्यात आला. त्यामुळे महिलांना न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तसेच कविता मासरे (रायसाकडा) या महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या सल्लागार असून तसेच सामाजिक कार्यकर्त्या म्हणून त्यांची ओळख आहे त्या अनेक महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न करीत असतात. तसेच महिलांना वेळोवेळी मदत करण्यासाठी ते सहकार्य करीत असतात.

याप्रसंगी वकील बार संघाचे सचिवपदी ॲड. निलेश सूर्यवंशी, सहसचिव पदी ॲड. अंबादास गोसावी, कार्यकारणी सदस्यपदी ॲड. एस. बी. माहेश्वरी, अॅड. प्रशांत कुलकर्णी, अॅड. दीपक पाटील, ॲड. अनिल पाटील, अॅड. रणसिंग राजपूत यांची निवड करण्यात आली. मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून ॲड. रणसिंग राजपूत यांनी कामकाज पाहिले. त्यांना सहकार्य करण्यासाठी ॲड. गोपाळ पाटील ॲड. मानसिंग सिद्धू, अॅड. अनिल पाटील यांचेसह निवडणुकीच्या वेळी वकील संघाचे सर्व सदस्य उपस्थित होते.

Protected Content